|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपाच्या खजिन्यात ठणठणाट

मनपाच्या खजिन्यात ठणठणाट 

 बेळगाव / प्रतिनिधी :

शहराच्या विकासासाठी स्मार्टसिटी योजनेंतर्गत 400 कोटी आणि मुख्यमंत्री अनुदानांतर्गत 100 कोटी, तसेच एसएफसी, 14 वा वित्त आयोग अशा विविध माध्यमातून महापालिकेला निधी उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे घरपट्टीच्या माध्यमातून वर्षाला 40 कोटीचा निधी जमा होऊन देखील महापालिकेच्या खजिन्यात ठणठणाट आहे. महापालिकेकडे सध्या केवळ 20 लाखच शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शहरवासियांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून मोठय़ाप्रमाणात निधी दिला जात आहे. तरी देखील शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कचऱयाची उचल व गटारांची स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही.  मात्र काही ठरावीक भागात चकाचक रस्ते आणि अत्याधुनिक विद्युत दिवे अशा सुविधांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी खर्ची घातला जात आहे. तो निधी कोठून आला असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. काही ठरावीक भागाच्या विकासासाठी महापालिकेचा खजिना रिकामा केला जात आहे. यामुळे महापालिकेच्या खजिन्यात सध्या ठणठणाट आहे.

Related posts: