|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाटीलबुवासह साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला

पाटीलबुवासह साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी गुरूवारी फेटाळल़ा यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनअर्ज दोषारोपपत्र दाखल होताच पाटीलबुवाने मागे घेतला. त्यानंतर बुद्धिबळाच्या पटाची चाल खेळत मुख्य न्यायदंडाधिकाऱयांकडे जामीनासाठी अर्ज सादर केल़ा मात्र सरकारी वकिल सोबिना फर्नाडिस यांनी आपल्या युक्तीवादाने पाटीलबुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडल़े

विभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पाटीलबुवा व प्रशांत प्रभाकर पारकर (47, ऱा उंडी), अनिल मारूती मयेकर (51, ऱा काळबादेवी), संदेश धोंडू पेडणेकर (44, ऱा काळबादेवी) यांच्याविरूद्ध भादवि कलम 420, 294, 34 व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी पाटीलबुवाने जामीनासाठी मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होत़ा तीन दिवस चाललेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यालालयाने गुरूवारी पाटीलबुवाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गुह्यांची गंभीर दखल घेत जामीन अर्ज फेटाळून लावल़ा

पाटीलबुवा यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामध्ये पोलीसांनी पाटीलबुवावर केवळ संशयाच्या आधारावर गुन्हा दाखल केला असून त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगितल़े त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये तो एकटाच कमावता असून त्याच्या कुटुंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आली आह़े तसेच पोलीसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आता तपास काम संपले असून त्याला जामीन देण्यास हरकत नाही असा युक्तीवाद केल़ा

मात्र सरकारी वकिल सोबिना फर्नांडिस यांनी पाटीलबुवा यांच्या वकिलांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोडून काढत जादूटोणा विरोधी कायद्यातील तरतुदींवर जोरदार अभ्यासपुर्ण युक्तीवाद केल़ा तसेच पाटीलबुवा व त्यांचे साथिदार कशा प्रकारे लोकांना फसवून त्यांच्या जमीनी हडप केल्या हे न्यालायलाच्या निदर्शनास आणून दिल़े तसेच दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी पोलीस पुढे देखील तपास करू शकतात़ पाटीलबुवाचा गुन्हा हा केवळ एका व्यक्तिविरूद्ध नसून तो समाजाविरूद्ध असल्याचे नमुद करत जामीन देण्याला जोरदार विरोध दर्शवल़ा मुख्यन्यायदंडाधिकाऱयांनी सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानत पाटीलबुवाचा व त्यांच्या अन्य तीन साथिदारांचा जामीन अर्ज फेटाळल़ा

Related posts: