|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त

कळंगुट, हणजूण येथे 7.90 लाखाचा ड्रग्ज जप्त 

प्रतिनिधी /पणजी :

गोवा पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हणजूण व कळंगुट अशा दोन ठिकाणी दोन दिवस केलेल्या कारवाईत 7 लाख 90 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. 29 व 30 नोव्हेंबर असे दोन दिवसात दोन तक्रारी नोंद केल्या आहेत. वर्षाच्या अखेरीला राज्यात मोठमेठय़ा पाटर्य़ा होत असतात आणि पाटर्य़ांसाठी गोव्यात मोठय़ाप्रमाणात ड्रग्ज येत असतो. हा ड्रग्ज रोखण्यासाठी एएनसी सज्ज झाली असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट येथे 29 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते पहाटे 4 दरम्यान केलेल्या कारवाईत एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून एलएसडी व गांजा मिळून 2 लाख 65 हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव जॉन बॅन ओकीकी (44, नायजेरियन) असे आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 22(6), 20 (बी), (2) (ए) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. रिमांडसाठी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रितेश गोवेकर पुढील तपास करीत आहेत.

हणजूण येथे सव्वा पाच लाखांचा ड्रग्ज जप्त

हणजूण येथे 30 रोजी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.45 दरम्यान केलेल्या कारवाईत 5 लाख 25 हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात आसाम येथील देबारून चौधरी (29) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 ग्राम एलएसडी व 25 ग्राम चरस जप्त केला आहे. संशयिता वारोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून आज शुक्रवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. संशयित मूळ आसामचा असला तरी गेल्या काही महिन्यापासून तो गोव्यातच राहत होता, अशी माहिती एनसीबीच्या पोलिसांनी दिली आहे.