|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद

ऍड.आयरीश यांची हणजूण पोलिसांत जबानी नोंद 

प्रतिनिधी /म्हापसा :

ऍड. आयरीश रॉड्रिगीस गुरुवारी दुपारी 12 वा. चौकशीला हणजूण पोलीस स्थानकात हजर राहिले. सुमारे एकतासभर त्यांनी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या समोर आपली जबानी दिली. यावेळी सवेरा या सेभाभावी संस्थेच्या अध्यक्षा तारा केरकर यांच्यासमवेत महिलांनी पोलीस स्थानकाबाहेर ठाण मांडून आयरीश यांच्या विरोधात घोषणा दिल्या. 

ऍड. आयरीश यांनी एका महिलेचा मंत्र्याशी संबंध असल्याची पोस्ट व्हॉटसऍपवर घालून सदर महिलेची बदनामी केली होती. या बाबत सोमवारी पीडित महिलेने व तिच्या पतीने आयरीश यांच्या रायबंदर येथील कार्यालयात घुसून जाब विचारला होता. तसेच त्यांच्यावर शेणाचे पाणी उडविले होते. याबाबतच व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता.

सत्य काय ते बाहेर येणार : ऍड. आयरीश

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई व दुर्गादास कामत यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी हा डाव आखला आहे. गोव्याची जनता मला गेल्या 40 वर्षापासून आपल्याला ओळखत आहे. आपल्या विरोधात लढविलेले हे राजकीय षडयंत्र आहे. जनता माझ्याबरोबर असून सत्य काय ते बाहेर येणार आहे, अशी प्रतिक्रिया ऍड. आयरीश रॉड्रिगीस यांनी हणजूण पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यावर बोलतान दिली.

पोलीस अधिकारीच योग्य तपास लावणार

मिल्टनचे नाव घेतले या बाबत काय असा प्रश्न पत्रकारांनी केला असता यावेळी आयरीश म्हणाले, जे या पूर्वी काही बोललो आहे त्याबाबत सर्व माहिती पोलीस अधिकाऱयांना दिली आहे. पत्रकारांसमोर आताच सर्वकाही माहिती उघड करू शकत नाही. कायद्याला आपल्या पद्धतीने जाऊ दे. न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. पूर्वी काही पोलीस अधिकारीवर्ग राजकाण्यांच्या बोटावर नाचत होते. आता तशी परिस्थिती आता नाही. येथे कुणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य रित्या चौकशी करणारे अधिकारी वर्ग आहेत. ते या प्रकरणाचा योग्यरित्या छडा लावणार आहेत.

Related posts: