|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून निवड प्रक्रिया 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रकियेला आजपासूनसुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारिख 4 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे तर

5 डिसेंबरला अर्जांची छाननी करून दुपारी 3.30 वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी जाहीर करण्यात येईल.मात्र पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे.त्यामुळे याच दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषणा होऊ शकते.अशाप्रकारे 9आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात होणाऱया गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

Related posts: