|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » विविधा » ब्रँडनामा पुस्तकाचे उद्या प्रकाशन

ब्रँडनामा पुस्तकाचे उद्या प्रकाशन 

 पुणे / प्रतिनिधी :

  रसिक आंतरभारतीच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या अभिजीत जोग लिखित ‘ब्रँडनामा’ पुस्तकाचे प्रकाशन उद्या (शनिवार) सायंकाळी 6.30 वाजता देवांग मेहता ऑडिटोरिअम, पर्सिस्टंट सिस्टिम, सेनापती बापट रोड येथे ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रकाशनप्रसंगी व्यवसायात स्वतःचा ब्रँड निर्माण केलेल्या चार उद्योजकांशी संवाद साधण्यात येणार आहे, यामध्ये सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर, परांजपे स्किम्सचे एम.डी. शशांक परांजपे, चितळे बंधूचे श्रीकृष्ण चितळे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांचा समावेश असणार आहे. मराठीतील आघाडीचे चित्रपट लेखक क्षितिज पटवर्धन या चौघांची मुलाखत घेणार आहेत. व्यवसाय, उद्योग कोणताही असो त्याला गरज असते जाहिरातीची, ब्रँड निर्माण करण्याची, त्याला छोटा, मोठा असा काही अपवाद ठरत नाही. ब्रँड निर्माण करण्याचे महत्त्व नेमके काय? एखादा ब्रँड कसा घडतो याची माहिती देणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक असणार आहे. 

Related posts: