मनसेने पाक बॉर्डवर जाऊन दादागिरी दाखवावी :रामदास आठवले

ऑनलाईन टीम / कल्याण :
मनसेने आज सकाळी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तन बॉर्डवर जाऊन दाखवावी,असा टोला केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
मुंबईतील कंग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड मनसेने केल्यानंतर मनसे आणिक् ाढाँग्रेसमधील वाद आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले , फेरीवाल्यांच्या बाजू घेताना काँग्रेसचे संजय निरूपम यांनी कायदा हाती घेऊ नये. मनसेनेही फेरीवाला प्रश्नी कायदा हाती घेऊ नये, तसेच मनसेने आपली दादागिरी ही पाकिस्तान बॉर्डवर जाऊन दाखवावी ,असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.