|Monday, December 17, 2018
You are here: Home » leadingnews » मोदी आवडतात परंतु मनमोहन सिंग चांगले मित्र : ओबामा

मोदी आवडतात परंतु मनमोहन सिंग चांगले मित्र : ओबामा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आवडतात. त्यांच्याकडे चांगला दृष्टीकोन आहे. भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचे काम ते करत आहेत परंतु माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील माझे चांगले मित्र आहेत, असे वक्तव्य अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले आहे.

‘हिंदुस्ता टाईम्स लीडरशिप समीट’ या कार्यक्रमात शुक्रवारी बराक ओबामा उपस्थित होते. नरेंद्र मोदी आणि ओबामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावर माध्यमांमध्ये नेहमी चर्चा रंगते. ओबामा यांच्या भारत दौऱया नरेंद्र मोदींनी ‘माझे मित्र बराक’असा उल्लेख केला होता. शुक्रवारी कार्यक्रमात ओबामांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. स्मितहास्य करत ओबामा काही क्षण थांबले आणि म्हणाले,‘मला मोदी आवडतात. ते देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मेहनत घेत आहेत.पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील माझे चांगले मित्र आहेत,असे त्यांनी सांगितले.

 

Related posts: