|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » ‘तिहेरी तलाक’च्या कायद्याचा मसुदा केंद्राकडून तयार

‘तिहेरी तलाक’च्या कायद्याचा मसुदा केंद्राकडून तयार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारने तिहेरी तलाकचा मसुदा तयार केला असून, हा विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा कायदा अस्तित्वात आल्यास तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच यातील दोषींना तीन वर्षांची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो.

केंद्र सरकारने तयार केलेल्या मसुद्याला ‘मुस्लिम वूमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स लॉ’ असे ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत संबंधित महिलेला भरपाई देण्याचा प्रस्ताव आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा मसुदा सभागृहात मांडण्यात येणार आहे. या मसुद्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास मुस्लिमांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Related posts: