|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » खाण लिलावातून 75 हजार कोटी

खाण लिलावातून 75 हजार कोटी 

नवी दिल्ली :

खाण लिलावासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने चालू आर्थिक वर्षात 75 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल सरकारी तिजोरीत जमा होईल. चालू आर्थिक वर्षात एकूण 34 खाणींचा लिलाव करण्यात येईल. लिलावासाठी किमान तीन बोलीदारांची आवश्यकता असल्याची महत्त्वपूर्ण अट हटविण्यात आल्याचे खाण मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार यांनी म्हटले. खाण लिलाव नियम, 2015 मधील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे लिलाव प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडण्याची शक्यता आहे.

 

Related posts: