|Thursday, December 13, 2018
You are here: Home » उद्योग » कच्चे तेल उत्पादनातील कपात कायम

कच्चे तेल उत्पादनातील कपात कायम 

डिसेंबर 2018 पर्यंत उत्पादन घटविणार  सौदी अरेबिया-रशिया एकत्र

वृत्तसंस्था/ व्हिएन्ना

ओपेक आणि रशियाच्या नेतृत्त्वाखालील कच्चे तेल देशांनी 2018 च्या अखेरपर्यंत खनिज तेलाच्या उत्पादनातील कपात कायम ठेवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली. रशियाने पहिल्यांदाच ओपेक देशांच्या नियमाच्या हिशेबानुसार खनिज तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला. बाजाराचे नुकसान न करता उत्पादन कपातीपासून बाहेर कशा प्रकारे पडता येईल याचे संकेत या संघटनेकडून देण्यात आले.

ओपेक देशांच्या मागील बैठकीत मार्च 2018 पर्यंत तेल उत्पादनातील कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यात वाढ करत डिसेंबर 2018 पर्यंत तेल उत्पादन कपात कायम ठेवण्यात येईल. व्हिएन्नामधील मुख्यालयात दीर्घकाळ बैठक सुरू होती आणि सर्व देशांचे उत्पादनाबाबत एकमत झाले. लीबियातील तेल उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहमती झाली नाही. लीबियात सध्या अंतर्गत कारणामुळे अस्थिरता आहे. खनिज तेल उत्पादन घटविण्याच्या कारणाने तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने आपले उत्पादन वाढवेल याची भीती रशियाला वाटते. सध्या सौदी अरेबिया आणि रशियाकडून सर्वाधिक तेलाचे उत्पादन होते. मात्र अमेरिकेकडून उत्पादन वाढविण्यात येत आहे.

Related posts: