|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » जीएसटी व्यावसायिकांसाठी सुलभ

जीएसटी व्यावसायिकांसाठी सुलभ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वस्तू व सेवा कर लागू करण्यात आल्याने व्यावसायिकांना आपला व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल आणि कराचे ओझे कमी करण्यास मदत होणार आहे. जीएसटीमुळे व्यापार करण्यास सुलभ झाल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले.

जीएसटी व नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेला मध्यम आणि दीर्घकालीन लाभ होईल. जीएसटीने व्यवसाय करणे आणि विस्तार करण्यास मदत होईल. प्रत्येक व्यावसायिकासाठी बाजारपेठेचा विस्तार झाला आहे आणि प्रत्येक व्यावसायिकाला संपूर्ण देशात व्यवसाय करणे सोपे झाले. व्यावसायिकांची गरज पाहता वस्तुंच्या करात बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात इन्स्पेक्टर राज उदयास येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. नोटाबंदी करण्यात आल्याचा त्याचा परिणाम एक ते दोन तिमाहींपुरताच दिसून आला, तर जीएसटीचा परिणाम एका तिमाहीपुरताच होता, असे त्यांनी म्हटले. 2017-18 च्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर तीन वर्षांच्या नीचांकावर म्हणजेच 5.7 टक्क्यांवर पोहोचला होता.

Related posts: