|Saturday, January 19, 2019
You are here: Home » उद्योग » ‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ 5 डिसेंबरपासून

‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ 5 डिसेंबरपासून 

प्रतिनिधी/ पुणे

‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ मुंबईत 5 ते 7 डिसेंबर रोजी दाखल होत असून, मुंबईतील गोरेगावमध्ये बॉम्बे कन्व्हेन्शन ऍण्ड एक्झिबिशन सेंटर येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.

चीनचे फर्निचर, घरगुती उपकरणे, टेक्सटाईल्स आणि कापड उद्योग, स्वयंपाक आणि बाथरूम, बाग आणि आरामदायी सुविधा, गिफ्ट्स तसेच दिवे यातील अग्रणीच्या निर्यातदार अधिकृत प्रतिनिधी हे होमलाईफ टेड फेअरअंतर्गत वैविध्यपूर्ण श्रेणी सादर करतील. द मॅचिनेक्स टेड फेअरद्वारे ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची आणि विस्तारीत श्रेणीतील उत्पादने उपलब्ध होतील. यात यंत्रसामग्री, ऊर्जा, हार्डवेअर आणि पॉवर टुल्स, ऑटोमोबाईल्स आणि मोटारसायकल, प्रिटिंग मशीनरी, रसायने, केबल आणि उपकरणे, फूड प्रोसेसिंग, प्लास्टिक मशिनरी, पॅकेजिंग मशिनरी, मशीन पार्ट्स आणि उपकरणे आदींचा समावेश असेल.

मेओरियंट इंटरनॅशनल एक्झिबिशन को.लि.चे सीओओ बिनू पिल्लई म्हणाले, भारत आणि चीन गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी संबंध जोपासत आहेत. भारतासह जागतिक स्तरावरील इतर व्यापाऱयांना चीनमधील निर्यातदार आणि उत्पादकांकडून दर्जेदार उत्पादने थेट उपलब्ध व्हावीत, यातील त्रुटी दूर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. भारताबरोबरच अन्य देशातही हे प्रदर्शन होईल.

विनमार्क एक्झिबिशनचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गुप्ता म्हणाले, यात 1200 पेक्षा जास्त प्रदर्शनकार, 25,000 पेक्षा जास्त प्रदर्शनीय उत्पादने आणि 750 पेक्षा जास्त उत्पादकांची निवड केली आहे.

Related posts: