|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » जीडीपी आकडेवारीनंतरही सावरण्यास अपयश

जीडीपी आकडेवारीनंतरही सावरण्यास अपयश 

बीएसईचा सेन्सेक्स 316, एनएसई निफ्टी 105 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

सप्ताहातील शेवटच्या आणि महिन्यातील पहिल्या सत्राची सुरुवात चांगली झाली होती. मात्र दिवसअखेरीस बाजारात मोठी घसरण होत बंद झाला. सकल राष्ट्रीय उत्पन्न विकास दर वाढूनही बाजारात तेजी येण्यास अपयश आले. वित्तीय तूट वाढण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर संकेत मिळाल्याने बाजारात दबाव आला.

बीएसईचा सेन्सेक्स 316 अंशाने घसरत 32,833 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 105 अंशाच्या कमजोरीने 10,122 वर स्थिरावला.

दिग्गज समभागाबरोबरच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही कमजोरी आली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरत 16,757 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी कमजोर होत 18,017 वर स्थिरावला.

बँकिंग समभागात कमजोरी आल्याने बँक निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत 25,190 वर बंद झाला. भांडवली बाजारात सर्व क्षेत्रातील निर्देशांकात घसरण झाली. धातू, आयटी, रिअल्टी, औषध आणि वाहन समभागात सर्वाधिक घसरण झाली. निफ्टीचा वाहन निर्देशांक 0.93 टक्के, आयटी निर्देशांक 1.5 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.7 टक्के, धातू निर्देशांक 1.6 टक्के, औषध निर्देशांक 1.6 टक्के आणि रिअल्टी निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरत बंद झाला. तेल आणि वायू निर्देशांक 1.5 टक्क्यांनी घसरला.

दिग्गज समभागांची कामगिरी

कोटक बँक, एनटीपीसी आणि मारुती सुझुकी हे केवळ 0.23-0.06 टक्क्यांनी वधारले. अदानी पोर्ट्स, बजाज ऑटो, भारती एअरटेल, सन फार्मा, एसबीआय, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा स्टील, हिंदुस्थान युनि, इन्फोसिस, पॉवरग्रिड, कोल इंडिया, रिलायन्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी 3.00-1.11 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅपमध्ये टाटा पॉवर, बँक ऑफ इंडिया, जीएमआर इन्फ्रा, युनियन बँक ऑफ इंडिया, अदानी पॉवर, टोरेन्ट पॉवर, एमआरएफ, सन टीव्ही 4.5-3.32 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात स्टील एक्स्चेंज इंडिया, सेरेब्रा, ट्रायजिन टेक्नो, फ्यूचर एन्टरप्राईज, रॅडिको, पेनिनसुला लँड 9.95-6.35 टक्क्यांनी घसरले.

बाजारात घसरण झाल्याने शुक्रवारी गुंतवणूकदारांना 1.43 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

Related posts: