|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आदित्यनाथ यांचा पुरेपूर उपयोग करणार भाजपची योजना

आदित्यनाथ यांचा पुरेपूर उपयोग करणार भाजपची योजना 

सौराष्ट्र

उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेचा पुरेपूर उपयोग गुजरात विधानसभा निवडणुकीत करून घेण्याची योजना भाजपने आखली आहे. आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात तीन दिवस सलग गुजरातमध्ये प्रचार केला. त्यांच्या सभांना लक्षणीय उपस्थिती होती. त्यामुळे त्यांचा प्रमुख प्रचारक म्हणून उपयोग करून घेण्यात येणार आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या निकालामुळे त्यांना अधिकच बळ प्राप्त झाल्याची भाजपची भावना आहे.

सौराष्ट्र, सुरत आणि पोरबंदर या भाजपच्या बालेकिल्ल्यात आदित्यनाथ यांनी तीन दिवस तळ ठोकला होता. विविध समाजघटकांशी त्यांनी सभांच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संवाद साधला. त्यांचा लोकांवर प्रभाव पडत आहे, अशी भाजपची खात्री पटली आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रचाराची अधिक जबाबदारी टाकली जाईल, हे निश्चित आहे.

उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकांचा थेट प्रभाव गुजरातमध्ये पडणार नसला तरी कार्यकर्त्यांच्या उत्साहात मोठी भर पडणार आहे. तसेच एकंदर वातावरण निर्मितीसाठी या निकालांचा भाजपला उपयोग होईल, अशी शक्मयता निवडणूक तज्ञही व्यक्त करू लागले आहेत. गुजरातमध्ये हिंदुत्व मानणारा मतदारांचा एक मोठा वर्ग असल्यामुळे आदित्यनाथ यांच्यासारख्या प्रचारकाचा तेथे चांगला लाभ होईल, अशी भाजप कार्यकर्त्यांची खात्री आहे.

आदित्यनाथ यांची वक्तृत्व शैलीही आक्रमक आणि प्रभावी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचाराची फार तयारी करून घ्यावी लागत नाही. विरोधी पक्षनेत्यांवर ते उत्स्फूर्तपणे बोचरी टीका करतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना लक्षपूर्वक ऐकले जाते, असा अनुभव आल्याने आगामी दहा दिवसात पंतप्रधान मोदी यांच्या खालोखाल आदित्यनाथच भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.

Related posts: