|Sunday, October 21, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पी. चिदंबरम यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे

पी. चिदंबरम यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे 

एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी ईडीची कारवाई

चेन्नई /  वृत्तसंस्था

एअरसेल-मॅक्सिस घोटाळय़ाप्रकरणी अंमलबजावणी संचनालयनाने (ईडी) माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नातेवाईकाच्या निवासस्थानी छापे टाकले. ईडीने शुक्रवारी चेन्नईमध्ये 4 आणि कोलकातामध्ये 2 ठिकाणी छापे टाकले. चेन्नईमध्ये कार्ति चिदंबरम यांचा मामा एम. कैलाशम, रामजी नटराजन आणि सुजाय संबामूर्ती यांच्या घरी छापे टाकण्यात आले.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात याचिका दाखल करत, एअरसेल-मॅक्सिस घोटाळा प्रकरणात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या समितीने 2006 मध्ये मंजुरीशिवाय 3,500 कोटी रुपयांच्या व्यवहाराला मंजुरी दिली होती असा आरोप केला होता. मात्र नियमांनुसार अर्थमंत्र्यांना 600 कोटी रुपयांच्या व्यवहारांना परवानगी देण्याचा अधिकार आहे. कार्ति चिदंबरम याने गुरुग्रामधील आपली संपत्ती लपविल्याचा आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीला भाडय़ाने दिल्याचा ईडीचा आरोप आहे. या कंपनीला 2013 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीतून मंजुरी मिळाली होती. कार्ति याने जप्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी काही बँक खाती बंद केल्याचा आणि काही खाती बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा ईडीचा आरोप आहे.

Related posts: