युवराजला ग्वाल्हेर विद्यापीठाची डॉक्टरेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुक्रवारी ग्वाल्हेर येथील आयटीएम विद्यापीठाच्यावतीने युवराज सिंगला मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. क्रिकेटच्या मैदानातील योगदानाबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानानंतर युवराजने विद्यापीठाचे आभार मानले. ही पदवी मिळाल्याचा अभिमान वाटत आहे. या सन्मानामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून, आगामी काळात ही पदवी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे तो यावेळी म्हणाला. यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला आसामा विद्यापीठ तर धोनीला मोंटफोर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आले होते. द वॉल राहुल द्रविडने मात्र बेंगळूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता.
Related posts:
Posted in: क्रिडा