|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » जर्मनीची विजयी सलामी

जर्मनीची विजयी सलामी 

हॉकी वर्ल्ड लीग अंतिम स्पर्धा : इंग्लंडवर 2-0 ने एकतर्फी मात

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

बलाढय़ जर्मनीने हॉकी वर्ल्ड लीग अंतिम स्पर्धेत विजयी सलामी देताना इंग्लंडवर 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. जर्मनीतर्फे मॅट्स ग्रॅमबोच व ख्रिस्तोफर रफ यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवत संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीने प्रारंभापासून आक्रमणावर भर दिला. सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात मात्र मॅट्सने 19 व्या मिनिटाला शानदार गोल करताना जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, लगेचच 25 व्या मिनिटाला ख्रिस्तोफरने मार्को मिटकोने दिलेल्या पासवर चेंडूला गोलजाळय़ात ढकलत जर्मनीतर्फे दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी घेतल्यामुळे इंग्लंडवर चांगलेच दडपण आले होते. मध्यंतरानंतर इंग्लंडने काही आक्रमणे करत गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश लाभले नाही. अखेरीस जर्मनीने 2-0 आघाडी कायम ठेवत शानदार विजयाची नोंद केली. या विजयासह ब गटात समावेश असणाऱया जर्मनीला तीन गुण मिळाले आहेत.

Related posts: