|Thursday, October 18, 2018
You are here: Home » क्रिडा » विंडीजचा 134 धावांत खुर्दा, वॅग्नरचे सात बळी

विंडीजचा 134 धावांत खुर्दा, वॅग्नरचे सात बळी 

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान न्यूझीलंडने विंडीजचा पहिल्या डावात केवळ 134 धावात खुर्दा केला. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज निल वॅग्नरने 39 धावात 7 गडी बाद करीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पहिल्या दिवसाअखेर न्यूझ्^ााrलंडने पहिल्या डावात 2 बाद 85 धावा जमविल्या होत्या. 

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर विंडीजची सलामीची जोडी क्रेग ब्रेथवेट आणि पॉवेल यानी डावाला सावध सुरूवात करताना 21.5 षटकात 59 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज वॅग्नरने   आखुड टप्प्याच्या गोलंदाजीवर विंडीजचा धुव्वा उडविला. वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर विंडीजने नंतरच्या 22 षटकात 75 धावांच्या मोबदल्यात 10 गडी गमविले. वॅग्नरची हॅट्ट्रीक साधण्याची संधी दोनवेळा हुकली. कसोटी क्रिकेटमधील वॅग्नरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्यावर्षी झिंबाब्वेविरूद्ध त्याने 41 धावात सहा गडी बाद केले होते. अलिकडेच विंडीजने झिंबाब्वेविरूध्दची कसोटी मालिका जिंकल्याने ते या कसोटीत अधिक आत्मविश्वसाने उतरतील असा तर्क होता. पण पॉवेल आणि ब्ा्रsथवेट यांच्या अर्धशतकी भागिदारीनंतर विंडीजचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.

क्रेग ब्रेथवेटने 70 चेंडूत 1 षटकारासह 24, पॉवेलने 79 चेंडूत 8 चौकारासह 42, हेटमेयरने 3 चौकारासह 13, डॉवरीचने 3 चौकारासह 18, रॉचने 2 चौकारासह नाबाद 14 आणि गॅब्ा्रियलने 2 चौकारासह 10 धावा जमविल्या. बिनबाद 59 या स्थितीनंतर विंडीजची स्थिती 7 बाद 97 अशी केविलवाणी झाली होती. विंडीजचा डाव 45.4 षटकात 134 धावात आटोपला. वॅग्नरने 39 धावात 7 तर बोल्टने 36 धावात दोन गडी बाद केले.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला समाधानकारक सुरूवात झाली. लॅथम आणि जीत रावल या सलामीच्या जोडीने 26.1 षटकात 65 धावांची भागिदारी केली. लॅथमने 87 चेंडूत 5 चौकारासह 37 धावा जमविल्या. होल्डरने त्याला झेलबाद केले. यानंतर कर्णधार विलियमसन केवळ एका धावेवर झेलबाद झाला. रॉचने त्याचा बळी मिळविला. दिवसअखेर रावल 3 चौकारासह 29 तर टेलर 2 चौकारासह 12 धावावर खेळत होते. विंडीजतर्फे होल्डर आणि रॉच यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडचा संघ 49 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे आठ गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडने आपले वर्चस्व राखले होते.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प डाव – 454 षटकात सर्वबाद 134 (पॉवेल 42, के. ब्रेथवेट 24, हेटमेयर 13, डॉवरीच 18, रॉच नाबाद 14, गॅब्रियल 10, वॅग्नर 7-39, बोल्ट 2-36), न्यूझीलंड प डाव – 38 षटकात 2 बाद 85 (लॅथम 37, रावल खेळत आहे 29, टेलर खेळत आहे 12, होल्डर आणि रॉच प्रत्येकी 1 बळी).

Related posts: