|Saturday, January 19, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून 

ऍशेस मालिकेतील दिवस-रात्र कसोटी

वृत्तसंस्था/ ऍडलेड

प्रतिष्ठेच्या ऍशेस मालिकेतील यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील दुसऱया दिवस-रात्र कसोटीला आजपासून (दि. 2) येथील ऍडलेड ओव्हल मैदानावर सुरुवात होत आहे. ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विद्यमान विजेता इंग्लंड संघ दुसऱया कसोटीत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 9 पासून खेळाला प्रारंभ होईल.

यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत इंग्लंडला 10 गडय़ांनी धुव्वा उडवताना पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऍडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणारी उभय संघातील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्रीचा होणार आहे. इंग्लंड संघात सध्या काही आलबेल नसून कर्णधार ज्यो रुटला बुधवारी सरावसत्रादरम्यान दुखापत झाली होती. रुटची दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो या कसोटीसाठी उपलब्ध असेल इंग्लिश संघ व्यवस्थापनाने सांगितले. बेन स्टोक्सचे निलंबन तसेच स्टीवन फिन व जेक बॉल दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडला त्यांची उणीव चांगलीच जाणवत आहे. या दिवस-रात्र कसोटीत अनुभवी ऍलिस्टर कूक, गॅरी बॅलन्स, बेअरस्टो, मॅलन यांच्यावरच फलंदाजीची भिस्त असेल. जलद गोलंदाजी हा ऍशेस मालिकेचा नेहमी प्राण राहिला असून इंग्लंडची भिस्त जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्स यांच्यावर असणार आहे.

पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवलेला यजमान ऑस्ट्रेलिया संघ दुसऱया दिवस-रात्रीच्या कसोटीतही विजयी पंरपरा कायम ठेवण्याच्या निर्धारानेच उतरेल. फलंदाजीत ऑसी कर्णधार स्टिव्ह स्मिथने पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी केली असून इतर फलंदाजानीही त्याला चांगली साथ दिली आहे. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाची भिस्त मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हॅझलवूड या वेगवान गोलंदाजावर अंवलबून असणार आहे. ऍशेस मालिकेतील पहिलीच कसोटी दिवस-रात्र पध्दतीने खेळवण्यात येणार असल्याने हा सामना चुरशीचा होईल, अशी प्रतिक्रिया ऑसी कर्णधार स्मिथने दिली.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), कॅमेरुन बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्कॉम्ब, शॉन मार्श, टीम पैने, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड, जॅक्सन बर्ड, चॅड सेयर्स, ग्लेन मॅक्सवेल.

इंग्लंड : जो रुट (कर्णधार), ऍलिस्टर कूक, मार्क स्टोनमन, डेव्हिड मॅलन, गॅरी बॅलन्स, जेम्स व्हिन्स, मोईन अली, जॉनी बेअरस्टो, मॅसन क्रेन, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जेक बॉल, क्रेग ओव्हर्टन, टॉम कुरान.

Related posts: