|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपुरात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ

जयसिंगपुरात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्यावतीने दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप, यज्ञ-याग व गुरुचरित्र पारायण सोहळ्यास मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जयसिंगपूर परिसरातील सुमारे अडीचशेहून अधिक भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

श्री दत्त जयंतीमित्त 4 डिसेंबर अखेर सुरु राहणाऱया या सप्हामध्ये दररोज पहाटे 5 ते 7.30 वाजेपर्यंत गुरुचरित्र वाचन, सकाळी 8 वाजता भुपाळी आरती, सामुहिक जप,  8.30 ते 10.30 वाजता नित्य स्वाहाकार, 10.30 वाजता नैवेदय आरती, दुपारी 2..30 ते 5 श्री दुर्गा सप्तश्री व श्री स्वामी चरीत्र वाचन, सायंकाळी 5.30 ते 6 वाजेपर्यंत औदुंबर प्रदक्षिणा, 6 वाजता नैवेद्य आरती त्यानंतर नित्य सेवा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

रविवार 3 रोजी दुपारी 12.39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे. 4 रोजी सत्यदन पूजन, महाआरती आणि नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे, तरी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

Related posts: