|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोगील खुर्द, गिरगावमध्ये आगीत ऊस, गवत भस्मसात

कोगील खुर्द, गिरगावमध्ये आगीत ऊस, गवत भस्मसात 

वार्ताहर/ गोकुळ शिरगाव

कोगील खुर्द व गिरगाव (ता. करवीर) येथे शॉर्ट सर्किट होऊन पाच एकरातील गवत व 3 एकरातील ऊस जळाला. ही घटना गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यामध्ये एकूण दोन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकऱयांनी सांगितले.

कोगील खुर्द व गिरगाव गावच्या दोन्ही गावच्या हद्दीमधील खोरी नावाच्या शेतामध्ये दुपारी गवताला आग लागली. गवत वाळलेले असल्यामुळे आगीने वेगात पेट घेतला. त्यामुळे आग वाढतच गेली. ही आग शेतातील उसाला लागल्याने शेतकऱयांची चांगलीच धांदल उडाली. जवळ पाण्याचे ठिकाण नसल्याने आग आटोक्मयात आणणे अवघड जात होते. पण तिथे ऊस तोडायला आलेल्या फडकऱयांनी ही आग आटोक्मयात आणली.

या आगीत बाजीराव घोटुगडे, रामचंद्र चव्हाण, सदाशिव चव्हाण, कृष्णात नवले, गोविंद नलवडे यांच्या गवताची डाग जळाल्या तर दत्तात्रय चव्हाण, कृष्णात नवले, विष्णू नवले यांच्या तीन एकरातील ऊस जळाला.

Related posts: