|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फेसबुकवरुन ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार

फेसबुकवरुन ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार 

आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ भोर

पुरंदर तालुक्यातील विवाहित तरुणाने फेसबुकवर ओळख वाढवून मर्ढे (ता. सातारा) येथील तरुणीशी अनैतिक संबंध ठेवले, न ठेवल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली. तसेच सदर तरुण विवाहित असल्याचे समजल्याने पिडीत तरुणीने राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. राजगड पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश जगताप (रा. मांडकी, ता.पुरंदर) यास अटक केली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.

सदर तरुणी 33 वयाची अविवाहित असुन फेसबुकवरुन तिची व आरोपीशी मैत्री झाली. आरोपीने अविवाहित असल्याचे सांगून सदर तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. रामकृष्ण लॉज (कामथडी, ता. भोर) येथे 2 डिसेंबर 2016 ते 21 नोव्हेंबर 2017 पर्यंत तरुणीवर शरीरसंबंध ठेवले. जेव्हा आरोपीचे लग्न झाल्याचे तरुणीला समजले तेव्हा तिने शरीर संबंधास नकार दिला असता विष प्राशन करुन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरूणीने आरोपी रमेश जगतापच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Related posts: