|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अधिवेशनात येताना अभ्यास करुन या

अधिवेशनात येताना अभ्यास करुन या 

प्रतिनिधी/ पणजी

बुधवार 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱया राज्य विधानसभा अधिवेशनाची पूर्व तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलविलेल्या आघाडी घटक पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित रहा, तसेच अभ्यास करुन या, असा सल्ला दिला.

पर्वरी येथे विधानसभा प्रकल्पात मुख्यमंत्र्यांनी सरकार पक्षातील सर्वच आमदारांची एकत्रित बैठक काल शुक्रवारी दुपारी 3 वाजता बोलाविली होती. मंत्री फ्रान्सिस डिसोझा, विश्वजित राणे, रोहन खंवटे हे तिघे बैठकीला उपस्थित नव्हते. मुख्यमंत्र्यांनी सर्वच आमदारांना व मंत्र्यांना सखोल अभ्यास करून येण्याचा सल्ला दिला.

सभागृहाबाहेर न जाण्याचा सल्ला

विरोधी पक्ष कोळसा व नद्यांच्या राष्ट्रीयीकरणासंदर्भात विषय उपस्थित करणार आहेत. त्यावेळी आपण समर्पक उत्तर अधिवेशनात देणार. तथापि, सत्तेवर असल्याने अधिवेशनाकडे दुर्लक्षून चालणार नाही. कोणीही सभागृहाबाहेर जाऊ नये. अधिवेशनात सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही बैठक सुमारे तासभर चालली.

अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री तयारीनिशी असतील. अधिवेशन 13 डिसेंबर रोजी सुरू होईल. 14 व 15 हे कामकाजाचे दिवस, त्यानंतर 18 रोजी व नंतर थेट 20 डिसेंबर रोजी अधिवेशनाचा समारोप होईल. अधिवेशनासाठी विरोधी पक्षांच्या आमदारांकडून मोठय़ा प्रमाणात प्रश्न आलेले आहेत. सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार तयारी चालविली आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या व पुरवणी विनियोग विधेयकही संमतीसाठी घेतले जाणार आहे.

Related posts: