|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊस वाहतूक ट्रक्टरने घेतला पेट

ऊस वाहतूक ट्रक्टरने घेतला पेट 

वार्ताहर / जमखंडी

ऊस वाहून नेणाऱया ट्रक्टरला विद्युत तारेचा स्पर्शाने पेट घेऊन अंदाजे 25 टन ऊस जळून खाक झाल्याची दुर्घटना जमखंडीतील जंबगी रस्त्याजवळ घडली. झुंजूरवाडहून ऊसाने भरलेला ट्रक्टर साईप्रिया साखर कारखान्याकडे जात होता. याचवेळी येथील जंबगी रस्त्याजवळ लोंबकळणाऱया विद्युत तारेच्या स्पर्शाने आग लागली असल्याचे सांगण्यात आले. यात ऊसासह ट्रक्टरचे पण आगीत नुकसान झाले. मुत्रण्णा तिप्परगी यांचा ट्रक्टर असून नुकसान भरपाई हेस्कॉमने करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली.

Related posts: