|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई

भटक्मया जनावरांना पकडण्याची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी

शहरात भटक्मया जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून वारंवार कारवाई करून देखील शहरातील रस्त्यांवर भटकी जनावरे ठाण मांडण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे शुक्रवारी शहरातील विविध भागात भटक्या जनावरांना जेरबंद करण्याची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली.

बाजारपेठेतील रस्त्यांवर आणि चौकात ठिकठिकाणी भटकी जनावरे ठाण मांडत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्यावतीने ही कारवाई महिन्यातून एकदा केली जाते. तरीदेखील आठ दिवसानंतर भटकी जनावरे पुन्हा रस्त्यांवर दिसतात. यामुळे महापालिकेची कारवाई नाममात्र आहे का? अशी विचारणा नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पकडण्यात आलेल्या जनावरांचा बंदोबस्त व्यवस्थितपणे करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. पण याची दखल घेतली जात नाही. शुक्रवारी सहा जनावरे पकडण्यात आली. ठिकठिकाणी जनावरांना पकडून गो शाळेत पाठविण्यात आले. पण या पकडण्यात आलेल्या जनावरांना पुन्हा सोडण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.

 

Related posts: