|Sunday, April 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » किरण बेदी यांचे बेळगावात स्वागत

किरण बेदी यांचे बेळगावात स्वागत 

प्रतिनिधी/ बेळगाव

 पाँडीचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांचे शुक्रवारी सकाळी सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन त्यांचे स्वागत झाले.

हुबळी येथील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किरण बेदी या बेळगाव (सांबरा) विमानतळावर आल्या होत्या. त्याठिकाणी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. चे सीईओ आर. रामचंद्रन, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने बँडच्या तालावर त्यांना मानवंदना दिली. त्यावेळी मान्यवर उपस्थित होते. या मानवंदनेचा स्वीकार करून त्यानंतर किरण बेदी यांनी हुबळी येथे प्रस्थान केले.

 

Related posts: