|Thursday, October 18, 2018
You are here: Home » leadingnews » राज्यातील 1300 शाळा बंद होणार ;राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील 1300 शाळा बंद होणार ;राज्य सरकारचा मोठा निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

राज्यातील जवळपास 1300 शाळा बंद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या शाळांची पटसंसख्या कमी गुणवत्तेमुळे घटली आहे.अशा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्या शाळातील पटसंख्या कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना जवळच्याच म्हणजेच सध्याच्या शाळेपासून 3 किमी असलेल्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 10पेक्षा कमी आहे. अशा शाळांना शिकवण्यासाठी शिक्षकही येत नसल्याचे समोर आल्यानंतर ,सरकारने हा निर्णय घेतला आहे. या डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

Related posts: