|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » विविधा »  सतीश आळेकर यांना ‘तन्वीर सन्मान’

 सतीश आळेकर यांना ‘तन्वीर सन्मान’ 

पुणे / प्रतिनिधी :

रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यावर्षी ज्येष्ठ दिग्दर्शक सतेश आळेकर यांना जाहीर झाला आहे. तसेच ‘नाटय़धर्मी पुरस्कार’ मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे तन्वीर पुरस्काराचे स्वरूप आहे, तर  पन्नास हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे नाटय़धर्मी पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अरूण खोपकर आणि मुक्ता बर्वे हे सतीश आळेकर यांच्याविषयी आपल्या भावना   व्यक्त करणार आहेत.

आळेकर हे थिएटर अकादमी संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या महानिर्वाण, मिकी आणि मेमसाहेब, महापूर अशा अनेक नाटकांनी रंगभूमीवर नवीन प्रवाह निर्माण केला. त्यांच्या अनेक नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरही झाले. ‘फोर्ड फाऊंडेशन’ च्या सहकार्याने घेतलेल्या नाटककारांच्या कार्यशाळा, महाराष्ट्रभर नाटय़विषयक केलेली उभारणी यातून प्रायोगिक नाटकाच्या सीमा पुण्या-मुंबईबाहेर नेण्याचे श्रेय आळेकर यांना जाते. पुणे विद्यापीठातील नाटय़विषयक अभ्यासक्रमाची बांधणी आणि ललित कला केंद्राच्या स्थापनेमध्ये आळेकर यांचे मोलाचे योगदान आहे. 2014 ते 2018 या कालावधीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ख्यातनाम प्राध्यापक या सन्मानित पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तर फैजे जलाली या अभिनेत्री, शिक्षिका, लेखिका म्हणून कार्यरत आहेत. विविध विद्यापीठातून रंगभूमीविषयक त्यांनी शिक्षण घेतले आहे. भारतीय तसेच अनेक परदेशातील नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

 

 

 

 

Related posts: