|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » मार्क झूकरबर्गच्या बहिणीचा विनयभंग

मार्क झूकरबर्गच्या बहिणीचा विनयभंग 

ऑनलाईन टीम / सिएटल :

फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाल्याची ामहिती समोर आली आहे.अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरवर्तन केले .लॉच एंजेलिसवरून मेक्सिकोला जाणाऱया विमानात हा प्रकार घडला.

हा प्रवासी वारंवार अश्लील संभाषण करून रॅन्डी झुकबर्गला त्रास देत होता.इतकेच नाही तर इतर महिला प्रवाशांबद्दल अशलील कमेंट्स करत होता, सोबतच मद्यपानही करत होता. याबाबतची तक्रार रॅन्डीने विमानातील कर्मचाऱयांना केली असता त्यांनी रॅन्डीलाच सीट बदलून देण्याची ऑफर दिली. ‘माझ्याच विनयभंग होत असताना मीच का माझी सीट सोडून जायचे, असा विचार माझ्या डोक्या आला,’’असे रॅन्डी म्हणाल्या. शेजारी बसलेल्याप्रवासी मला आणि फर्स्ट क्लासमध्ये बसलेल्या इतर लोकांवर अश्लील शेरेबाजी करत होता,हा प्रवासी हस्तमैथुन आणि माझ्यासोहत प्रवास करणाऱया कलीगबाबत आक्षेपार्ह टिप्पाणी करत होता. तसेच विमानात चढणाऱया महिला प्रवाशांच्या शरीराबाबत अश्लील शेरेबाजी करत होता, असे रॅन्डी झुकरबर्ग यांनी एअरलाईन्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

 

 

Related posts: