|Monday, January 21, 2019
You are here: Home » leadingnews » बावन्नकशी शतकासह विराटही पाच हजारी मनसबदार

बावन्नकशी शतकासह विराटही पाच हजारी मनसबदार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रनमशीन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले 52वे शतक झळकावतानाच पाच हजारी मनसबदारांमध्ये स्थान मिळवण्याचा मान मिळवला आहे.

विराटने श्रीलंकेविरोधात शतक झळकावून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विराटचा हा 63वा कसोटी सामना असून सर्वाधिक वेगवान पाच हजार धावा पटकावणारा तो फलंदाज ठरला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर 67 कसोटीत पाच हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. मात्र विराटने 63 कसोटीतच नवा विक्रम रचला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात सलामीवीर मुरली विजय याने मोलाची साथ दिली. विजयनेही सलग दुसरे शतक फटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

 

 

 

 

Related posts: