|Thursday, December 14, 2017
You are here: Home » Automobiles » मारूती सुजूकीची नवी ‘सीलेरियो एक्स’ कार लाँच

मारूती सुजूकीची नवी ‘सीलेरियो एक्स’ कार लाँच 

ऑनलाईन टीम / जालंधर :

मारूती सुजुकी कंपनीने तरूणांना आकर्षित करण्यासाठी ‘सिलेरियो’चे एक्स मॉडेल लाँच केले आहे. या कारच्या पुढच्या भागाच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहे. या कारची किंमत चार लाखांपासून असल्याची माहिती मिळाली आहे.

या कारच्या प्रंट बम्पर आणि फॉग लॅम्पच्या डिसाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. याशिवाय या कारमध्ये स्पोक अलॉय व्हील्स व रियर स्पोयलर देण्यात आले आहे. यामुळे या कारला वेगळे लूक मिळाल्याचे दिसून येते. या कराच्या आतील बाजूस काळया रंगाचा डैशबोर्ड लावण्यात आला आहे. तसेच स्टेरिंग आणि सीट्सला लाल रंगाच्या स्ट्रीप्स सोबत मॅच करण्यात आले आहे. या कारबाबत बोलताना मारूती सुजुकी लीमिटेडचे कार्यकारी संचालक आर.एस. कल्सी म्हणाले, सिलेरियो कारने कॉम्पकेट कार सेंगमेंटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी दाखल्याने सिलेरियोने पुन्हा एक्स मॉडेल लाँच केले आहे. आम्हाला विश्वास आहे की ही कार तरूणाईला नक्कीच आकर्षिक करेल.

 

Related posts: