|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गरिबांचे धान्य काळ्य़ा बाजारात विक्री करताना 7 जणांना अटक

गरिबांचे धान्य काळ्य़ा बाजारात विक्री करताना 7 जणांना अटक 

एक हजार किलो तांदुळ, अडीचशे लिटर रॉकेलसह चार लाखाचा साठा जप्त

चाफे येथील ग्रामस्थांनी उघड केला प्रकार

मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय

प्रतिनिधी /रत्नागिरी

तालुक्यातील चाफे येथील रेशन दुकानावरील गरिबांचे धान्य व रॉकेल काळ्य़ा बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयगड पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1 हजार किलो तांदुळ व अडीचशे लिटर रॉकेल व टाटा झेनॉन गाडी असा मिळून सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आह़े

चाफे येथे शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी या प्रकरणी सुरेश लक्ष्मण घवाळी (62), गणपत गोपाळ घवाळी (48), रामचंद्र जानू घवाळी (62), सुधाकर सोना घवाळी (60), कृष्णा येसा घवाळी (45), रामचंद्र शकंर घवाळी (47, सर्व राहणार पानवल) व योगेश जाधव (33 ऱा धामणसे) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़

संजय पांडुरंग सागवेकर हे चाफे गावात रेशन दुकान चालवतात़ या दुकानातून गरिबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य काळ्य़ा बाजारात विकले जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत़ा या घटनेची कुणकुण स्थानिक रहिवाशांना लागली होत़ी यावर लक्ष ठेवून असलेल्या स्थानिक रहिवाशांना शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रेशन दुकान येथून शुक्रवारी टाटा झेनॉन गाडीत काळ्य़ा बाजारात विक्रीसाठी माल भरला जात असल्याचे दिसून आल़े या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना बोलावून गाडीचालक योगेश जाधवसह व त्याच्यासोबत असलेल्या सातजणांना ताब्यात घेतल़े

त्यांच्याकडून 50 किलोच्या पिशव्यांमध्ये असलेले 1 हजार किलो तांदुळ, अडीचशे लिटर रॉकेल यामध्ये 35 लिटरच्या 7 पॅनचा समावेश, एक टाटा झेनॉन (एमएच 08 डब्लू 4899) कंपनीची गाडी असा मिळून सूमारे 4 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े या घटनेची माहिती मिळताच जिह्यातील अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतल़ी रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक यशवंत कुळ्य़े यांनी या संदर्भात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सरकारी रेशन दुकानावरून गरिबांचे धान्य काळ्य़ा बाजारात विकले जात असल्याच्या या घटनेमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आह़े

Related posts: