|Friday, March 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र

एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र 

हैदराबाद

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीं शनिवारी हैदराबादमध्ये भाजप आणि काँग्रेसवर टीका करत दोन्ही पक्ष गुजरात निवडणुकीत धर्माचा वापर करत असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे दावे पोकळ आहेत. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये हिंदू होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आपण जानवेधारी हिंदू तर जैन आणि हिंदू असल्याचे सांगता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा मार्ग तयार केला होता? स्वातंत्र्येसेनानींनी स्वतःचे बलिदान यासाठी दिले होते का असे प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.

उपाध्यक्ष हिंदू आणि जानवेधारी असल्याचे काँग्रेस सांगते. मोदी हिंदू आणि ओबीसी असल्याचे भाजपकडून सांगितले जाते. हा खूपच सन्माननीय क्लब असल्याचे वाटते, यात माझ्यासारख्या लोकांना प्रवेश मिळणार नाही, कारण मी सांप्रदायिक आणि उर्वरित धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी असल्याची खोचक टीका ओवैसी यांनी केली.

माझ्या क्लबमध्ये कोणासोबत कोणताच भेदभाव नाही. केंद्र सरकार तिहेरी तलाकबद्दल कायदा निर्माण करणार आहे. सरकारने असे केले तर शरियामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रकार ठरेल असा दावा ओवैसी यांनी केला.

Related posts: