|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

बुध, शनिची अंशात्मक युती आपल्या रेंगाळत पडलेल्या कामांना गती देणार आहे. नोकरीत कामाचा व्याप जरी वाढला तरी सहकाऱयांच्या मदतीने वेळेवर पूर्ण करू शकाल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय आठवडय़ाच्या सुरुवातीला घेण्याचा प्रयत्न करा. गुरुवार, शुक्रवार प्रकृतीची थोडी काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. शेअर्सचा अंदाज घेताना उतावळेपणा नको. अनोळखी व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करणे अथवा मैत्री वाढवणे धोक्मयाचे ठरू शकते.


वृषभ

या आठवडय़ात योग्य प्रकारे कामाचे नियोजन केल्यास अडथळे कमी निर्माण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत:च्या जोरावर निर्णय घेऊ नका. वरि÷ांच्या विचारांना महत्त्व द्या. प्रेमप्रकरणात यश मिळेल. विवाहाचे योग जुळून येतील. ग्रहांची फारशी साथ नसली तरी या आठवडय़ात प्रकृतीत सुधारणा होईल. जमिनीसंबंधी व्यवहारात फायदा मिळू शकतो. कला-क्रीडा क्षेत्रात मिळेल ती संधी घ्या. शेतीच्या कामात अडथळे कमी होतील. प्रवासात मात्र दगदग संभवते.


मिथुन

आठवडय़ाची सुरुवात मात्र थोडी तापदायक असणार आहे. शेतकरी व कुटुंबातील माणसांशी वाद, गैरसमज संभवतात. नोकरीत वरि÷ आपल्या कामावर खूष राहणार आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रात आता नवीन झेप घेण्यास हरकत नाही. नाटय़ चित्रपट क्षेत्रात आपले नावलौकिक वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. प्रवासाचेच बेत आखले जातील. धंद्याला चालना मिळेल. शेतीच्या कामात शांतपणे कामे हाताळा.


कर्क

आठवडय़ाची सुरुवात घरातील वातावरण सुखद करणारी असणार आहे. मात्र राजकीय, सामाजिक क्षेत्रात ताणतणाव वाढणार  आहे. आत्मविश्वास व प्रति÷ा डळमळीत करण्याचा प्रयत्न चोहोबाजूने होईल. जवळची व विश्वासांची माणसे दगा देण्याची शक्मयता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. औषध व पथ्य पाळा. कोर्टकेसमध्ये अडचणी थोडय़ा कमी होतील. कला क्रीडाक्षेत्रात प्रकृतीची काळजी घ्या. अभ्यासात जास्त लक्ष द्यावे लागेल.


सिंह

या आठवडय़ात महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रेमप्रकरणात दगा संभवतो. एखादी गोष्ट मानसिक ताण वाढवत असेल तर ती जीवनसाथीबरोबर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा संभवतो. धंद्यातील जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. नवीन विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढेल. शुक्रवारी मात्र प्रकृतीची थोडी काळजी घ्या. वाहन जपून चालवा.


कन्या

राजकीय सामाजिक क्षेत्रात आपसात झालेले गैरसमज दूर करता येतील. शत्रुपक्षाच्या कारवाया उघडकीस आणू शकाल. संयम ठेवावा लागेल. तेव्हाच उच्चपदासाठी निवड होणे शक्मय आहे. घाईत कुठलाही निर्णय घेणे आता अयोग्य ठरेल. काही लोक आपले नाव खराब करण्याचा प्रयत्न करणार आहेत. सहकाऱयांबरोबर चांगली वागणूक ठेवा व लोकसंग्रह वाढविण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. शेतीच्या कामांना आता गती मिळेल. शनिवारी घरातील समस्या वाढण्याची शक्मयता आहे


तुळ

साडेसाती संपली आहे. मात्र इतर ग्रहांचा पाठिंबा अजून थोडा कमी असल्याने छोटय़ा छोटय़ा अडचणी येत आहेत. कष्ट व प्रयत्नाचा जोर वाढवला तर कोणतेही शिखर गाठू शकाल. व्यवसायात भर पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पष्टपणे मत मांडू नका. गैरसमज निर्माण होईल. बुधवारपासून नोकरीतील अडचणी कमी होतील. नाटय़ चित्रपट क्षेत्रातील आपल्या कामाचे कौतुक होईल. पुरस्कार मिळू शकतो. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो.


वृश्चिक

बुध शनिची अंशात्मक युती सर्वच ठिकाणी असलेला तणाव कमी करणार आहे. कुटुंबात शुभ समाचार मिळेल.उत्साह वाढल्यामुळे कामांना गती मिळेल. मंगळवार, बुधवार व्यवसायात व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनाला बळी पडू नका. शेतकरी वर्गाला कोणाची मदत घेऊन त्यांचे काम मार्गी लावता येईल. अति धाडस करून संकट वाढवू नका. कला क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कोर्टकचेरीचे काम स्वत:हून ओढवून घेऊ नका. वाहन जपून चालवा.


धनु

चंद्र, बुध प्रतियुती व चंद्र गुरु त्रिकोण योग तुम्हाला अडचणीतून वाटचाल कशी करावयाची यासाठी सहाय्यकारक ठरतील. संसारात ताणतणाव गुरुवार, शुक्रवार होईल.स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक गुंतवणूक करताना घाई नको. नवीन ओळख झालेल्या माणसावर एकदम विश्वास टाकणे धोक्मयाचे ठरेल. प्रेमात वाद होईल. राजकीय, सामाजिक कार्यात  आरोप येतील. तुमच्या चुका होतील. नोकरीत मोहाला बळी पडू नका. वरि÷ांची मर्जी राखा, कौटुंबिक वाटाघाटीत समस्या येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मतभेद होईल. मैत्रीत नाराजी संभवते.


मकर

कोणतीही अति महत्त्वाची कामे याच उत्साहात करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची साथ असते तेव्हा प्रयत्न सत्कारणी लागतात. चंद्र, गुरु लाभयोग व सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. साडेसाती सुरू आहे. राजकीय, सामाजीक कार्यात प्रभाव दिसेल. लोकांचे प्रेम मिळेल. तुम्ही केलेले काम कौतुकास्पद ठरेल. व्यवसायात घाई नको. तणाव होईल. कामगारांना सांभाळून घ्या. गुंतवणुकीची घाई नको. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. संसारात आनंदी वातावरण राहील. प्रवासाचा आनंद घ्याल.


कुंभ

चंद्र, बुध प्रतियुती व सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात वेगाने प्रगतीच्या दिशेने जाल. प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची मते सर्वांना पटवून देता येतील. लोकप्रियता मिळेल. पदाधिकार मिळेल. तुमचे  अनुभव इतरांना फायद्याचे ठरतील. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला, क्रीडा साहित्यात चमकाल. लाभ मिळेल. मनाप्रमाणे प्रगती करू शकाल. शेतकऱयाला नवी बाजारपेठ मिळेल. नवे तंत्र फायदेशीर ठरेल.


मीन

रागावर नियंत्रण ठेवल्यास रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. बुध, शनि युती व सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात संघर्ष असला तरी या आठवडय़ात  तुमचा अंदाज बरोबर येईल. वर्चस्व राहील. प्रति÷ा मिळेल. व्यवसायात तत्परता ठेवा. वाद वाढवू नका. कठोर बोलणे घातक ठरते. संसारात सुखद वातावरण राहील. नवे काम मिळेल. कला क्रीडा क्षेत्रात प्रगती, शनिवारी दुखापत संभवते. वाहन जपून चालवा. विद्यार्थी वर्गाने जिद्द सोडू नये. अभ्यास करावा.

Related posts: