|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘आयएमओ’ परिषदेमध्ये भारताचे स्थान अबाधित

‘आयएमओ’ परिषदेमध्ये भारताचे स्थान अबाधित 

निवडणुकीमध्ये मिळाली दुसऱया क्रमांकाची 144 मतेपुढील दोन वर्षांसाठी असेल सदस्यत्व

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) म्हणजे आंतरराष्ट्रीय समुद्री संघटन परिषदेवर भारताचे स्थान पुन्हा एकदा अबाधित राहिले आहे. लंडन येथील मुख्यालयामध्ये यासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये भारताने दुसऱया क्रमांकाची मते मिळविल्याने पुढील दोन वर्षांसाठी सदस्य कायम राहणार आहे. 10 सदस्य असणाऱया या परिषदेचा भारत 1959 पासून सदस्य आहे. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाय. के. सिन्हा यांनी या परिषदेत प्रतिनिधीत्व केले.

या निवडणुकीसाठी नौकानयन मंत्री नितीन गडकरी लंडनमध्ये तळ ठोकून होते. भारताच्या बाजूने मतदान होण्यासाठी त्यांनी प्रचार केला. आयएमओची ही बी श्रेणीची परिषद आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेची ही एक शाखा असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील जहाज वाहतूक व सुरक्षा व्यवस्थापन करण्याचे काम ही परिषद करते. तसेच समुद्र प्रदूषण नियंत्रणाचीही जबाबदारी सांभाळत असते. या परिषदेसाठी पहिल्यांदाच सदस्यत्वासाठी निवडणूक झाली आहे. याआधी 1983 व 84 साली भारत या परिषदेचा सदस्य नव्हता. या निवडणुकीमध्ये जर्मनीने 146 मते प्राप्त केली. या परिषदेत ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा, स्पेन, ब्राझील, स्वीडन, नेदरलँड आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचाही समावेश आहे.

 

Related posts: