|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » क्रिडा » दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूर मुंबई संघाबाहेर

दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूर मुंबई संघाबाहेर 

वृत्तसंस्था/ मुंबई

नागपूर येथे खेळवल्या जाणाऱया रणजी चषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत मुंबईसमोर बलाढय़ कर्नाटकचे आव्हान असेल. या महत्वपूर्ण सामन्यासाठी मुंबईचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळणार नाही. तसेच फॉर्मममध्ये नसलेल्या अभिषेक नायरलाही निवड समितीने पुन्हा संघाबाहेर ठेवणे पसंत केले आहे. शनिवारी कर्नाटकविरुद्ध लढतीसाठी मुंबई संघ जाहीर केला. निवड समितीने युवा सागर त्रिवेदी, शिवम मल्होत्रा, शिवम दुबे व शुभम रांजणे या खेळाडूंना संघात दिले आहे. 7 ते 11 डिसेंबरदरम्यान उभय संघात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर महत्वपूर्ण लढत होईल. कर्नाटकविरुद्ध हा सामना मुंबईसमोर ‘करो वा मरो’ परिस्थीतीचा असल्याने या सामन्यात मुंबईसमोर मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई रणजी संघ – आदित्य तरे (कर्णधार), सुर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, सिध्देश लाड, जय बिस्ता, पृथ्वी शॉ, अखिल हेरवाडकर, सुफियान शेख, आकाश पारकर, कर्ष कोठारी, सागर त्रिवेदी, विजय गोहिल, शिवम मल्होत्रा, शिवम दुबे व शुभम रांजणे.

Related posts: