|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 बाद 209

इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया 4 बाद 209 

वृत्तसंस्था/ ऍडलेड

पुन्हा सूर सापडलेला उस्मान ख्वाजा (8 चौकारांसह 53) व कर्णधार स्टीव्ह स्मिथ (40) यांच्या जोरकस फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर देखील इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेतील दुसऱया कसोटीत पहिल्या दिवशी 81 षटकात 4 बाद 209 धावा जमवल्या. पाहुण्या संघाने कॅमेरुन बॅन्क्रॉफ्टला (10) स्वस्तात बाद केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने 47 धावांचे योगदान दिले. नंतर ख्वाजा व स्मिथ यांनी 53 धावांची भागीदारी साकारली.

प्रारंभी, यजमान ऑस्ट्रेलियाने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली व या दिवस-रात्र कसोटीत डिनर ब्रेक घेण्यात आला, तोवर 2 बाद 138 धावा जमवल्या होत्या. ख्वाजा त्यावेळी 53 तर स्टीव्ह स्मिथ 25 धावांवर खेळत होता. यापूर्वी गब्बा येथे नाबाद 141 धावांसह सामना जिंकून देणारी खेळी साकारणारा स्टीव्ह स्मिथची स्टुअर्ट ब्रॉडशी झालेली शाब्दिक चकमक तणाव निर्माण करणारी ठरली.

ख्वाजाने नंतर 26 व्या कसोटीतील आपले नववे अर्धशतक साजरे केले. मोईन अलीला चौकारासाठी पिटाळत त्याने हा टप्पा गाठला. डावातील 47 व्या षटकात वॉर्नर बाद झाला, त्यावेळी वोक्ससाठी ती प्राईज विकेट ठरली. इंग्लंडचे जलद गोलंदाज जेम्स अँडरसन व ब्रॉड यांनी पहिल्या महत्त्वाच्या तासाभरात गुलाबी चेंडूसह उसळत्या माऱयावरच भर दिला. अर्थात, पहिल्या सत्रात सातत्याने संततधार होत राहिल्याने केवळ 13.5 षटकांचा खेळ होऊ शकला. यापूर्वी, गब्बा येथे इंग्लंडला यापूर्वीच दहा गडय़ांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, येथे आणखी अपयश स्वीकारणे त्यांना निश्चितच परवडणारे नसेल.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 81 षटकात 4/209 (उस्मान ख्वाजा 112 चेंडूत 8 चौकारांसह 53, डेव्हिड वॉर्नर 5 चौकारांसह 47, हँडस्कॉम्ब 83 चौकारांसह नाबाद 36, शॉन मार्श 58 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 20. अवांतर 3. अँडरसन, वोक्स व ओव्हर्टन प्रत्येकी 1 बळी).

Related posts: