|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक

खंडणी प्रकरणातील फरार संशयित अविनाश जर्मनीस अटक 

प्रतिनिधी / इचलकरंजी

इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार व साईनाथनगरातील दुकानदाराकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश शेखर जर्मनी (वय 31, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून 60 हजार रूपयांचे पिस्टल पोलिसांनी हस्तगत केले. शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी शहरातील वाढत्या घरफोडय़ा व चोऱयांबाबत पोलिस अधिक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे यांनी बैठक घेवून शहरातील तीनही पोलिस ठाण्यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश पोवार यांनी गुन्हे शोध पथकास सक्रीय पेट्रोलिंग करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना रेकॉर्डवरील संशयित आरोपी अविनाश शेखर जर्मनी हा येथील जवाहरनगरमधील हनुमान मंदीराशेजारील बागेजवळ उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेवून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 60 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल मिळून आले.

अविनाश जर्मनी हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, इचलकरंजीसह विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. काही दिवसांपुर्वी अविनाश जर्मनी व त्याच्या साथीदारांनी साईनगर येथील किराणा दुकानदार विरूपाक्ष हळूर यांच्याकडे 3 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने जर्मनी याने त्याच्या पाच साथीदारांसह रात्री येवून लोखंडी रॉड व यंत्रमागाच्या लाकडी माऱयाने हल्ला केला होता. यामध्ये तानाजी हळूर हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी इतर पाच संशयितांना अटक केली होती. पण अविनाश जर्मनी हा अद्यापीही फरारी होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ही कामगिरी पोलिस अधिक्षक संजय मोहिते, गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे, शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक धनंजय पिंगळे व प्रज्ञा चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक अनिल मोरे, पोलिस हेडकाँस्टेबल सुधाकर बागुल, रफिक पाथरवट, पोलिस नाईक हनुमंत माळी, अनिल पाटील, काँस्टेबल महादेव घाटगे, विकास कुरणे, अर्जुन फातले यांनी केली.    

Related posts: