|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चाळीस लिटर दूध देणारी गाय, 29 कांडय़ांचा ऊस

चाळीस लिटर दूध देणारी गाय, 29 कांडय़ांचा ऊस 

सेतज’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील तपोवन मैदानावर भरविण्यात आलेले ‘सतेज’ कृषी व पशुपक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी महापूर उसळला असून आधुनिक शेती औजारे, बी-बियाणे व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची एकच गर्दी झाली. आहे विशेष म्हणजे तब्बल 300 किलोचे डय़ुयार्क जातीचे डुक्कर, शंभर किलोचा बोकड, 10 किलोचा केंबडा आणि 40 लिटर दूध देणारी जर्सी गाय प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे. विविध शेतीमाल उत्पादनांमध्ये 299 कांडय़ा तयार झालेला 12 ते 15 फूट उंचीचा ऊसही या प्रदर्शनात शेतकऱयांचे लक्ष वेधून  घेत आहे.

आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने तपोवन मैदानावर ’सतेज कृषी प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे 4 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.  प्रदर्शनात आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानासह शेताली उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. शनिवारी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱयांसह परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. शेतकऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. शेतीसह दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रदर्शन व विक्रीही या ठिकाणी सुरू आहे.

 खाद्या पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी

 शेतीविषयक विविध स्टॉलबरोबरच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे विक्री स्टॉलही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत तसेच खाद्य पदार्थांचेही अनेक स्टॉल असल्याने या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी होत आहे लॉलीपॉप, बिर्याणी, लोणीडोसा, वडा कोंबडा अशा विविध खाद्यपदार्थांची जोरात विक्री होऊ लागली आहे

39 कांडय़ा तयार ऊस लक्षवेधी

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीमध्ये केलेल्या प्रगतीचे दर्शन या प्रदर्शनात दिसून येते हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील बाळासाहेब जाधव यांनी पिकवलेला को- 86032 हा ऊसही या प्रदर्शनात आहे तब्बल 38 ते 39 पेरे असलेल्या या उसाची उंची 15 फूट आहे याच ठिकाणी कोगे येथील प्रगतिशील शेतकरी तानाजी मोरे यांचाही जवारी ऊस आहे 10 ते 12 फूट उंची असलेल्या या उसाला 22 पेरे आहेत खास रसवंतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करून हे उत्पादन घेतले आहे मोरे यांनी सेंद्रिय खाताचा वापर करून उत्पादन घेतलेला 11 किलो वजनाचा अंकुर भोपळा व लिंबूही प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.

डय़ुयार्क व व्हाईटयार्क जातीची डुक्कर

 वडणगे, ता करवीर येथील जोतिराम विष्णू घोडके यांची 40 लिटर दूध देणारी जर्सी गाय या प्रदर्शनातील खास आकर्षण ठरत आहे. गायीला पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. स्वप्नील टिपुगडे यांनी डय़ुयार्क व व्हाईटयार्क जातीची डुक्कर प्रदर्शनात आणली आहेत या दोन्ही डुकरांचे वजन तब्बल 300 किलो असल्याचे टिपुगडे यांनी सांगितले.

26 महिन्याचा जातिवंत खिलार बैल

पंढरपूर, बीड, सांगोला येथून काही शेतकरी खिलार बैलजोडय़ा घेऊन आले आहेत अवघ्या 26 महिन्यांचा दोन दाती खिलार बैल लोकांचे लक्ष वेधून घेत आहे भोसे, ता पंढरपूर येथील भारत किसन जमदाडे यांचा खिलार खोंड आहे, तर महीम, ता. सांगोला येथील तुकाराम निवृत्ती बंडगर यांचाही साडेतीन वर्षांचा खिलार खोंड व काही घोडेही गर्दी खेचत आहेत.  सेनापती कापशी येथील विठ्ठल आणुसे यांचा दीड फूट शिंगांचा बोकड, रंगीबेरंगी गेनिपिक उंदीर, पांढरा पोपट, रंगीबेरंगी लवबर्ड, मांगले येथील राजेंद्र परीट यांचा 3 वर्षांचा मुऱहा जातीचा वळू लक्षवेधून घेत आहे. सोमवार पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

Related posts: