|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपूरात सिद्धेश्वर मंदिरातील तीन दानपेटय़ा अज्ञाताकडून लंपास

जयसिंगपूरात सिद्धेश्वर मंदिरातील तीन दानपेटय़ा अज्ञाताकडून लंपास 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

  येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिराच्या पश्चिमेच्या दरवाज्याच्या झडपाची काच फोडून कडी काढून दोन दानपेटय़ा अज्ञात चोरटय़ांनी लंपास केल्या. सदर घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असावी. या दोन्ही दान पेटय़ांमध्ये अंदाजे दोन लाख रूपयांची दान असण्याची शक्मयता आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात मंदिराचे पूजारी दिलीप जंगम यांनी फिर्याद दिली आहे. शहरवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मंदिरात घडलेल्या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मंदिराच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मंदिरातील पुजारी दिलीप जंगम यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंदिर बंद केले. यानंतर ते शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पूजा अर्चा करण्यासाठी मंदिर उघडले असता त्यांना पश्चिमेकडील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. तर मंदिराच्या गाभाऱयाबाहेर दोन्ही बाजूला असणाऱया दोन मोठय़ दानपेटय़ा नसल्याचे जाणवले. यावेळी त्यांनी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष व ट्रस्टींशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी काही ट्रस्टी घटनास्थळी दाखल होवून सदरची माहिती पोलिस ठाण्यास दिली. यावेळी पोलिस उपाधिक्षक डॉ. सई भोरे-पाटील या पोलीस कर्मचाऱयांच्यासह मंदिरात येवून पहाणी केली. यावेळी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान हे मंदिर परिसरातच घुटमळले. तर ठसेतज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री धिरंजे यांनी पहाणी केली असता झडपाच्या फुटलेल्या काचेवर व अन्य ठिकाणी काही ठसे आढळून आले आहेत. 

  या तपासासाठी इचलकरंजी गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक व जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱयांचे दोन पथके अशी एकूण तीन पथके पोलिस उपाधिक्षक डॉ. सई भोरे-पाटील व रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत करण्यात आली आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेटय़ा चोरीला गेल्याचे वृत्त समजताच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना पोलिस उपाधिक्षक भोरे-पाटील म्हणाल्या, चोरीचे गांभीर्य लक्षात घेता तीन पथके तयार करण्यात आली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. 

  चोरीस गेलेल्या मंदिरातील दानपेटय़ा या चार फूट उंचीच्या व चारी बाजूने दिडफूट रूंदीच्या आणि सुमारे 70 किलो वजनाच्या असल्यामुळे या   चोरीमध्ये किमान चार ते पाच जणांचा समावेश असण्याची शक्मयता असून पेटय़ा घेवून जाण्याकरीता चार चाकी वाहनाचाही वापर केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुढी पाडव्याच्यानंतर श्रावण महिना व नुकताच पार पडलेल्या कलशारोहण व शिवलिंग प्राणप्रति÷ापणा सोहळा यामुळे या दोन्ही दानपेटीत सुमारे दिड ते दोन लाख रूपयांचे दान असण्याचे शक्मयता आहे. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता तपासाचा भाग म्हणून सर्व ट्रस्टी, पुजारी व व्यवस्थापक यांनी आपली हाताची ठसे स्वतःहून पोलीस ठाण्यात दिली आहेत. 

शनिवारी होणार होते दोन्ही पेटीतील रक्कमेचे मोजमाप…

  नुकताच ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरामध्ये कलशारोहन व शिवलिंग प्राणप्रति÷ापणा सोहळा मोठय़ उत्साहात साजरा झाला. शिवाय गुढी पाडव्यापासून या दोन्ही दानपेटय़ा उघडण्यात आल्या नव्हत्या. यामुळे शनिवारी सायंकाळी या दोन्ही पेटय़ा ट्रस्टींनी उघडून आतील रक्कमेचे मोजमाप करून सदरची रक्कम देवालय ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा करणार होते. मात्र पहाटेच या दोन्ही पेटय़ा लंपास झाल्याचे घटना घडली. 

Related posts: