|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही

कोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

जिल्हा बँकेने दौलत साखर कारखाना गोकाकच्या न्युट्रियन्स कंपनीला चालवायला दिला आहे. त्यानंतर शेतकऱयांच्या ऊसाचे बील, कामगारांचा पगार देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. असे असताना जिल्हा बँकेच्या अधिकाऱयांना, कर्मचाऱयांना कांही मंडळी दादागिरी करत आहेत. बँकेच्या कर्मचाऱयांच्या केसाला धक्का जरी लागला तरी शांत बसणार नाही. चंदगड कुणाची जहागीरी नाही. त्यामुळे चंदगडला आपण जाणार असून कोणाचीही दादागीरी खपवून घेणार नाही. असा दम बँकेचे चेअरमन, आमदार हसन मुश्रीफ यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला.

दौलत साखर कारखाना सद्या बंद आहे. यावर आंदोलन होत असून त्याअनुषगाने आमदार मुश्रीफ यांना चंदगड तालुक्यात येवू देणार नाही असा इशारा दिला आहे. याचा चांगलाच समाचार आज आमदार मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या कार्यक्रमात घेतला. दौलत कारखान्याच्या 74 कोटीच्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली होती. या कारखाना लिलावाच्या व भाडय़ाने देण्याच्या 11 वेळा निविदा काढल्या होत्या. शेवटी जिल्हा बँपेचे व्हा. चेअरमन विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या पुढाकाराने न्युट्रियन्स कंपनीला 45 वर्षे कराराने हा कारखाना जिल्हा बँकेने चालवावयास दिला. कंपनीने बँकेच्या अटी पुर्ण केल्यावर कारखाना दिला असून 34 कोटी भरले आहेत. मार्च अखेर कंपनीने 10 कोटी बँकेला देणे गरजेचे आहे. ही रक्कम भरली नाही तर करार संपुष्टात येणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

दौलत कारखाना न्युट्रियन्सने घेवून गतवर्षीचे गाळपही केले आहे. मात्र शेतकऱयांचे ऊसाचे बिल आणि कामगारांचा पगार दिला नाही. ही रक्कम देण्याची गरज होती. याबाबत आपले दुमत नाही. कारखाना चालवायलाच दिल्याने या रक्कमेशी जिल्हा बँकेचा संबंध काय ? असा प्रश्न आमदार मुश्रीफ यांनी केला. आपण याबाबत व्हा. चेअरमन अप्पी पाटील यांना विचारले असते पण ते बँकेकडेही फिरकले नाहीत. असे सांगत माहिती घेण्यापुर्वी जिल्हा बॅंकेच्या शाखेत जावून अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की केली आहे. यापुढे अशी दादागीरी सहन करणार नाही. संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी असून आपल्याला रोखण्याची हिंम्मत अद्याप कोणाला झाली नाही. कोणीतरी आपल्याला चंदगडला येवू देणार नाही असा इशारा दिल्याचे आपल्या वाचणात आले आहे. त्यांना कळवून चंदगडला जाणार असून रोखायचे असल्यास त्यावेळी सांगावे असेही आमदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Related posts: