|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आंतरजिल्हा बदलीग्रस्त 23 शिक्षकांना दिल्या शाळा

आंतरजिल्हा बदलीग्रस्त 23 शिक्षकांना दिल्या शाळा 

ऑनलाईन पद्धतीने बदल्यांची प्रक्रिया पडली पार

प्रतिनिधी/ सातारा

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा अजूनही रेंगाळला आहे. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने सातारा जिह्यात आलेल्या 23 शिक्षकांना शाळा दिल्या गेल्या नव्हत्या. शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी 9.30 वाजता त्या शिक्षकांना बोलवून ऑनलाईन पद्धतीने शाळा दिल्या. लगेच जागेवर ऑर्डरही दिली गेली. ही प्रक्रिया पारदर्शकपणाने पार पडल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.

सातारा जिह्यातील 2772 शाळा आहेत. त्यामध्ये अनेक शिक्षकांची पदे अजूनही रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदलीने येणाऱयांची संख्या सुमारे 350 च्या आसपास आहे. जिल्हातंर्गत बदल्यांचा प्रश्न शिक्षक नेत्यांच्या अडेलतट्टूपणामुळे रेंगाळला आहे. शासनाने 27 फेब्रुवारीचा अद्यादेश हा सुगम आणि दुर्गम या निकषानुसार दुर्गम भागातील शिक्षकांवर अन्याय होवू नये म्हणून काढला आहे. परंतु शहरालगतच्या शाळेत काम करणाऱया शिक्षकांच्या नेत्यांनी मात्र या अद्यादेशाला विरोध करुन बदली प्रक्रिया लांबवली जात आहे. अशाच प्रक्रियेत पर जिह्यातून साताऱयात येवू पाहणारेही अडकले आहेत. मात्र जे आलेले 23 जण होते. त्यांना शाळा दिल्या गेल्या नव्हते. शनिवारी त्यांना शाळा देण्यात आल्या. ही प्रक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी एच.व्ही.जाधव यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. त्यानुसार कराड तालुक्यात 2, खंडाळा 1, पाटण 13, फलटण 1, माण 3, वाई 1, सातारा 2 अशा 23 शिक्षकांच्या तर त्यामध्ये गरोदर माता 1, स्तनदा माता 3, अपघाती अपंगत्व 2, अपंग 3, अपंग मुलांचे पालक 1, पतीपत्नी एकत्रिकरण 4 सर्वसाधारण 14 अशा पद्धतीने शिक्षकांना शाळा देण्यात आल्या आहेत.

रडारड अन् चिडाचिड नाही

पाठीमागच्यावेळी दुर्गम भागात महिलांना शाळा दिल्यावरुन रडून गोंधळ केला होता. त्याच शिक्षकांसाठी ऐन सुट्टीच्या काळात बदली प्रक्रिया राबवली गेली. त्याचे अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरु असते. कोणी किती घेतले ते. परंतु या प्रक्रियेमध्ये शिक्षकांची रडारडही नाही आणि चिडाचिडही नाही, असे चित्र दिसत होते. 

Related posts: