|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » टॅक्सी व रिक्षा परवाने खुले करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सहा आठवडयांची स्थगिती

टॅक्सी व रिक्षा परवाने खुले करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सहा आठवडयांची स्थगिती 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

टॅक्सी व रिक्षा परवाने खुले करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सहा आठवडयांची स्थगिती दिली आहे या संदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णया विरोधात महाबळेश्वर व पांचगणी येथील टॅक्सी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती

         गेल्या अनेक वर्षां पासुन टॅक्सी व रिक्षा परवाने वाटप बंद होते परंतु काही महीन्यांपुर्वी केंद्र शासनाने परवाने खुले करण्याचे आदेश राज्य शासनास दिले होते केंद्र शासनाच्या सुचने नुसार राज्य शासनाने जुन 2017 मध्ये टॅक्सी व रिक्षा परवाने खुले करण्याचा निर्णय जाहीर केला होता हा निर्णय घेताना राज्य शासनाने सध्या रस्त्यावर असलेल्या वाहनांच्या संख्येचा विचार केला नाही तसेच परवाने वितरीत करताना कोणते निकष लावले जाणार या बाबतही निश्चित असे धोरण ठरविले नाही केंद्र शासनाने आदेश दिले म्हणुन घाई घाईत राज्य शासनाने मागे पुढे न पाहता व कोणतेही ठोस धोरण निकष न ठरविता परवाने खुले करण्याचा निर्णय जाहीर केला या निर्णया विरोधात महाबळेश्वर व पांचगणी येथील टॅक्सी संघटनांनी राज्य शासनाच्या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात धाव घेवुन याचिका दाखल केली या याचिकेची सुनावणी वेळी राज्य शासनाने परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला असला तरी अदयाप परवाने देण्यास सुरूवात केली नाही अशी बाजु मांडली तेव्हा उच्च न्यायालयाने टॅक्सी संघटनांना राज्य शासनाने परवाने वाटप सुरू केल्या नंतर या असे सांगुन परवाने सुरू करताना टॅक्सी संघटनांना विश्वात घ्या असे राज्य शासनाला सुचना केल्या होत्या परंतु राज्य शासनाने 27 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व उपप्रादेशीक परीवहन अधिकारी यांना परवाने वाटप करण्याचे आदेश दिले या आदेशा नुसार उप प्रादेशीक परीवहन अधिकारी यांनी 9 आक्टोंबर रोजी राज्य शासनाच्या आदेशा नुसार परवाने वितरीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या या संदर्भात सातारा येथे टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी व परीवहन कार्यालयातील अधिकारी यांच्या बरोबर बैठका झाल्या परंतु काही तोडगा न निघाल्यामुळे या दोन्ही संघटनांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली 

          महाबळेश्वर टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बावळेकर व पांचगणी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कासुर्डे यांनी पत्रकारांना माहीती दिली ते म्हणाले टॅक्सी संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की महाबळेश्वर व पांचगणी ही शहरे पर्यटन स्थळे आहेत येथील स्थानिक लोकसंख्ये पेक्षा कितीतरी अधिक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात महाबळेश्वर शहराचा विचार केला तर येथे 385 काळी पिवळी टॅक्सी आहेत 521 टुरिस्ट वाहने आहेत या व्यतिरिक्त नागरीकांची व पर्यटकांची खाजगी वाहनांची संख्या देखिल सुमारे 1 हजार आहे गावठाण मध्ये एवढया मोठया संख्येने असलेल्या वाहनांसाठी पुरेसे वाहनतळ नाही त्या मुळे ही सर्व वाहीने शहरातील विविध रस्त्यांवर उभी राहतात त्या मुळे शहर व परीसरात नेहमी वाहतुकीची कोंडी होते जर राज्य शासनाने परवाने खुले केले तर वाहनांची संख्या बेसुमार वाढणार आहे या वाढलेल्या वाहनांमुळे शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडुन पडेल त्याचा विपरीत परीणाम येथील पर्यटनावर होईल या कडे टॅक्सी संघटनांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे या यचिकेची सुनावणी घेवुन उच्च न्यायालयाने परवाने खुले करण्याच्या निर्णयाला सहा आठवडयांची स्थगिती दिली आहे उच्च न्यायालयाच्या न्या शंतनु एस केमकर व न्या जी एस कुलकर्णी या खंडपिठाने हा स्थगितीचा निर्णय घेतला आहे टॅक्सी संघटनांच्या वतीने उच्च न्यायालयात जेष्ठ विधिज्ञ नारघोळकर , ऍड विश्वजीत मोहीते ऍड सिध्दार्थ करपे ऍड शहा व ऍड केतन जोशी यांनी काम पाहीले सहा आठवडयां नंतर राज्य शासन या निर्णया बाबत काय धोरण निश्चित करणार या कडे दोन्ही टॅक्सी संघटनांचे लक्ष लागुन राहीले आहे 

Related posts: