|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बीच क्लीनिंग घोटाळा प्रकरण पुन्हा एसीबीकडे

बीच क्लीनिंग घोटाळा प्रकरण पुन्हा एसीबीकडे 

प्रतिनिधी/ पणजी

माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या विरोधातील बीच क्लीनिंग घोटाळा प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली जाणार असून याप्रकरणी आता नव्याने भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल याबाबत स्पष्ट संकेत देताना पुन्हा तपासाचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

बीच क्लीनिंग घोटाळा प्रकरणी लोकायुक्तने सीबीआय किंवा भ्रष्टाचार विरोधी विभागामार्फत चौकशी करावी असा आदेश दिला होता. मात्र सरकारने भ्रष्टाचार प्रकरण सीबीआयकडे देण्याचे टाळले. भ्रष्टाचार विरोधी विभागामार्फत चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बीच क्लीनिंग घोटाळा प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करुन ऍड, आयरीश रॉड्रीग्स यांनी लोकायुक्तापाशी तक्रार केली होती. याप्रकरणी महसूलमंत्री रोहन खंवटे यांनीही आवाज उठविला होता.

याप्रकरणी लोकायुक्तने निष्कर्ष कोटय़ावधी रुपये काम न करता वाया घालविले असे नमूद केले आहे. याप्रकरणी पर्यटन खात्याचे अधिकारी व कंत्राटदार कंपनीवर लोकायुक्तने ठपका ठेवला आहे. या बीच क्लीनिंग प्रकरणाची सखोल चौकशी करावी असा आदेश लोकायुक्तनी दिला होता या चौकशीसाठी सरकारकडे 90 दिवसांचा कालावधी होता. 16 डिसेंबर रोजी हा कालावधी संपत आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्र्याना विचारले असता त्यानी भूमिका स्पष्ट केली.

बीच क्लीनिंग प्रकरणात कोटय़ावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढून लोकायुक्ताने तात्कालीन पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनाही दोषी धरले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तनी दिले होते. मात्र या प्रकरणात याअगोदर भ्रष्टाचार विरोधी विभागाने परुळेकर यांना क्लीन चीट दिली होती. आता पुन्हा हे प्रकरण भ्रष्टाचार विरोधी विभागाकडेच सोपविले जाणार आहे.

Related posts: