|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता रक्षणासाठी कायदा करणार

अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता रक्षणासाठी कायदा करणार 

प्रतिनिधी/ पणजी

दुबई दौऱयावर असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी दुबई येथे ‘गोवा फॉरवर्ड ऑफ युएई’ कार्यालयाचे उद्घाटन केले. युएईमध्ये असलेल्या दोन लाख गोमंतकींबाबत सरकार जाणीव ठेऊन आहे. त्याचबरोबर या अनिवासी गोमंतकीयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सरकार विशेष कायदा करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी या नीज गोयकरांना दिले.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांना दुबईत एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या मूळ गोमंतकीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. दोन लाख गोमंतकीय युनायटेड अरब अमिरात मध्ये आहेत. गोव्याच्या लोकसंख्येच्या मानाने ही संख्या एक अष्ठमांश एवढी आहे. मूळ गोयकार असलेल्या या लोकांच्या समस्या जाणून घेणेहे गोवा सरकारचे धोरण आहे. त्यानुसार विजय सरदेसाई यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्याचबरोबर त्यांच्या गोव्यात असलेल्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी सरकार बांधील असल्याचेही ते म्हणाले.

या मालमत्ताच्या संरक्षणासाठी सरकार खाश कायदा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर दुबईतील व युएईमधील गोयकारांनी गोव्यात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दुबईतच नव्हे तर अन्य देशात असणाऱया गोयकारांना संघटित करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 50 वर्षापूर्वी गोव्यातून तात्कालीन वाहतूक सुविध असलेल्या वाफोरमधून आलेले गोमंतकीय यावेळी सरदेसाई यांना भेटले. अनिवासी गोयकार व गोवा सरकार यांच्यातील दुवा बनून या गोयकारांच्या समस्या गोवा फॉरवर्ड सोडविणार असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Related posts: