|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोंधळी गल्लीतील मंदिरात दत्त जयंती साजरी

गोंधळी गल्लीतील मंदिरात दत्त जयंती साजरी 

प्रतिनिधी/ बेळगाव

गोंधळी गल्ली येथील सार्वजनिक श्री दत्त मंदिर उत्सव मंडळातर्फे शनिवारी दत्त जयंती पालखी उत्सव पार पडला. प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. गुरुदत्त मंदिरापासून पालखीला सुरुवात होऊन वेताळ मंदिर, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, डॉ. शेटय़े हॉस्पिटल मार्ग, गवळी गल्लीमार्गे गोंधळी गल्लीतील मंदिर आवारात सांगता करण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला. सायंकाळी जन्मोत्सव सोहळा पार पडला. रात्री महाआरती करण्यात आली.

यावेळी सचिन सुरेकर, सुरेश शिंदे, रामू नांगळे, शंकर पावशे, राजेश सावंत, गौरव कुलकर्णी, पराग शिंदे, अमित किल्लेकर, जयवंत रेवाळ, प्रकाश शिंदे व महिला उपस्थित होत्या.

Related posts: