|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धारवाडरोड उड्डाणपूल उद्घाटनाचा मुहूर्त टळण्याची शक्मयता

धारवाडरोड उड्डाणपूल उद्घाटनाचा मुहूर्त टळण्याची शक्मयता 

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर रोड येथील ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजूच्या भिंतीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मात्र धारवाड रोड येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने दि. 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण  होणे अशक्मय आहे. दि. 25 रोजी उद्घाटन करण्याचा प्रस्ताव आहे. पण सद्यपरिस्थिती पाहता उद्घाटनाचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे. 

 धारवाड रोड आणि खानापूर रोड अशा दोन ठिकाणी ओव्हरब्रिज उभारणीचे काम सुरू आहे. पण धारवाड रोड येथील काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी करण्यात आल्याने दि. 25 डिसेंबरपर्यंत  काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण अद्यापही काम संथगतीने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने रॅम्प बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच आणखी दोन ट्रॉझल बीम उभारणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे मार्गादरम्यान लोखंडी स्पॅन घालण्यात येणार आहेत. त्यानंतर गर्डर घालून स्लॅब घालण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पण काम दि. 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अशक्मय आहे. यामुळे सदर काम पूर्ण होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्मयता आहे.

खानापूर रोडवरील ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्यास नागरिकांना विरोध केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सदर काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजूने भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच रेल्वे फाटकादरम्यान पुलाच्या दोन्ही बाजूने पिलर उभारण्यात येणार आहे. यामुळे याकरिता आवश्यक तयारी रेल्वे खात्याने आणि कंत्राटदाराने केली आहे. यामुळे सदर काम लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.

 

Related posts: