|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरकारी सुटीमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प

सरकारी सुटीमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प 

प्रतिनिधी / बेळगाव

शनिवारी न्यायालये सुरू असली तरी सरकारी कार्यालये बंद असल्यामुळे त्याचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाला आहे. ईद-ए-मिलादची सुटी शुक्रवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यामध्ये बदल करून ती शनिवारी करण्यात आली. पण न्यायालयाला यापूर्वीच सुटी जाहीर करण्यात आल्यामुळे शुक्रवारी न्यायालये बंद होती. शनिवारी न्यायालये सुरू ठेवण्यात आली. पण सरकारी अधिकारी साक्षीसाठी उपस्थित नसल्याने न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.

उच्च न्यायालयाने यापूर्वीच ईद-ए-मिलादची शुक्रवारी सुटी जाहीर केली होती. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेल्या तारखा त्या सुटीनुसार देण्यात आला होत्या. यामुळे शुक्रवारी पूर्णपणे न्यायालये बंद होती. पण सरकारने अचानकपणे सुटी पुढे ढकलली. यामुळे सरकारी सुटी शुक्रवारऐवजी शनिवारी जाहीर करण्यात आली. याचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर झाल्याचे दिसून आले. शनिवारी न्यायालये सुरू असली तरी अनेकांनी कामकाजाकडे पाठ फिरविली होती. काही न्यायाधीशांनीही सुटी घेतल्यामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.

सलग सुटय़ांमुळे अनेक वकिलांनी विश्रांती घेणेच पसंत केले. सुटीच्या गोंधळामुळे पक्षकारांनीही न्यायालयाकडे पाठ फिरविली होती. मात्र काही वकिलांनी आपल्या पक्षकारांना न्यायालयात हजर करून कामकाज केले. काही खटल्यांमध्ये सरकारी अधिकाऱयांची साक्ष होणे गरजेचे होते. पण सुटीमुळे ते अधिकारी फिरकलेच नाहीत. याचा परिणाम न्यायालयीन कामकाजावर दिसून आला. दुपारनंतर मात्र न्यायालयामध्ये शुकशुकाट पसरला होता.

Related posts: