|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कलाकारांच्या सरावात भरू लागले रंग

कलाकारांच्या सरावात भरू लागले रंग 

बेळगाव / प्रतिनिधी

जाणता राजा महानाटय़ सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या महानाटय़ात असणारे स्थानिक कलाकार अधिकाधिक सराव करून जाणता राजामधील आपल्या अभिनयाची छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. या नाटय़ाचे दिग्दर्शक योगेश शिरोळे कलाकारांकडून हुबेहुब अभिनय करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराका÷ा करत आहेत. त्यामुळे नाटकाच्या तालमीला आता रंग चढू लागला आहे.

शनिवारी सकाळी कलाकारांच्या सुरू असलेल्या तालमीची तरुण भारतचे  समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी पाहणी केली. कलाकार घेत असलेली मेहनत पाहून त्यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना ठाकुर म्हणाले, जाणता राजा या नाटय़ातून स्थानिक कलाकारांमध्ये चैतन्य निर्माण केले जात आहे. तसेच महानाटय़ात कलाकारांना सरस भूमिका करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

योगेश शिरोळे यांनी सुरू असलेल्या तालमीची किरण ठाकुर यांना माहिती करून दिली. यावेळी नाटकातील एक प्रवेश स्थानिक कलाकारांनी सादर करून दाखविला. यामध्ये बेळगावमधील 110 कलाकार आहेत. त्यात लहान मुले, युवक, युवती, महिलांचा समावेश आहे. या कलाकारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.      

Related posts: